
रजनीकांत माने यांचा सन्मान
00186
रजनीकांत माने
-----------
रजनीकांत माने यांचा सन्मान
रांगोळी ः येथील कामगार नेते रजनीकांत माने यांना श्रावस्ती बहुउद्देशीय सेवा संस्थेतर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट नेतृत्व पुरस्काराने सन्मानित केले. माजी खासदार राजू शेट्टी यांच्याहस्ते माने यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवले. सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या श्रावस्ती बहुजन संस्थेतर्फे समाजामध्ये निस्वार्थी कार्य करणारे तसेच सामाजिक कार्यकर्ते यांना प्रत्येकवर्षी असा पुरस्कार देण्यात येतो. बांधकाम कामगार, यंत्रमाग कामगार व घरेलू महिला कामगार यांना विविध सुविधा पुरवण्याबरोबर शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिल्याबद्दल रजनीकांत माने यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट नेतृत्व पुरस्कार दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार राजू शेट्टी होते. संस्थेचे अध्यक्षा भक्ती शिंदे, सचिव राहुल वराळे व मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा झाला.