रांगोळी माळभागात गटर्सची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रांगोळी माळभागात गटर्सची मागणी
रांगोळी माळभागात गटर्सची मागणी

रांगोळी माळभागात गटर्सची मागणी

sakal_logo
By

रांगोळी माळभागात गटर्सची मागणी
रांगोळी, ता. २६ ः येथील आंबेडकरनगर माळभाग प्रभाग क्रमांक दोनमध्ये गटर्स नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. लवकरात लवकर गटर्स करण्याची मागणी नागरिकांनी ग्रामपंचायतीस निवेदनाद्वारे केली आहे.
येथील माळभाग परिसरात कित्येक वर्षे सांडपाणी निचरा करण्यासाठी गटर्स नाहीत. पावसाळ्यात येथे सांडपाणी साठुन रहाते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सांडपाणी एकमेकांच्या दारात जात असल्यामुळे कायम वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. पंधरा वर्षे या गटर्ससाठी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला आहे. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीस गटर्स बांधून सांडपाण्याचा निचरा करण्याबाबत निवेदन दिले.
निवेदनाचा लवकरात लवकर पाठपुरावा न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निखिल कुरणे, अक्षय कांबळे, नितीन कांबळे, शेखर कांबळे आदी उपस्थित होते.
-------
येथे गटर्स बांधल्यानंतर सांडपाणी निचरा होणे गरजेचे आहे. यासाठी इंजिनिअरमार्फत जागेची पाहणी केली जाईल. यानंतर मासिक सभेमध्ये हा विषय घेऊन गटर्सचे काम केले जाईल.
-संगीता नरदे, सरपंच, रांगोळी ग्रामपंचायत