
रांगोळी येथील शुद्ध पेयजल( फिल्टर) बंद अवस्थेत.
00227
रांगोळी ः येथील बंद असलेले शुद्ध पेयजलचे शेड.
रांगोळीत पेयजल केंद्र बंदच
चार वर्षांपूर्वी उभारणी; पंचायतीलजवळ बसवण्याची मागणी
रांगोळी ता. १ ः येथे जिल्हा परिषदेकडून ४ वर्षांपूर्वी शुद्ध पेयजल (फिल्टर) मिळाले होते. हे फिल्टर बाजार कट्टा येथे बसविण्यात आले होते. परंतु आजअखेर चालू करण्यात आले नाही.
गावातील नागरिकांना गेले कित्येक वर्षे प्रदुषित पंचगंगा नदीमधुन पाणीपुरवठा केला जातो. यामुळे जिल्हा परिषदेकडून ३ वर्षापूर्वी जवळपास चार लाख रुपये किंमतीचे शुद्ध पेयजल (फिल्टर) गावांसाठी देण्यात आले होते. हे फिल्टर पहिला बाजार कट्टा येथे बसविण्यात आले होते. परंतु गेल्या तीन वर्षांत चालू केले नाही.यामुळे या फिल्टर मधील सर्व मशिनरी, मोटर्स खराब झाल्याने बंद अवस्थेत पडल्या आहेत. सध्या हे फिल्टर बाजार कट्टा येथुन काढून एका संस्थेच्या जागेत बसविले आहे. नुसतेच रिकामे पत्र्याचे शेड व ठराविकच यंत्रसामग्री यामध्ये दिसून येते. हे पेयजल ग्रामपंचायतीजवळ बसविल्यास सर्व नागरिकांना याची सोय होणार आहे. यामुळे हे पेयजल तेथून हलवून गावच्या मध्य ठिकाणी बसविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शासनाने नागरिकांसाठी दिलेल्या योजनांचा नागरिकांना लाभ होत नसल्यामुळे पंचायतीच्या विरोधात नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोट-
शुध्द पेयजल (फिल्टर) सुरू करण्याची सूचना काॅन्ट्रक्टरला देण्यात आली आहे. यामधील मशिनरी रिपेअरी झालेनंतर ग्रामपंचायतीच्या आवारात बसवून चालु करण्यात येईल.
- संगीता नरदे, सरपंच रांगोळी.