
रांगोळीयेथील तळीत मगरीचा वावर..
रांगोळीमध्ये मगरीचा वावर;
शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण
रांगोळी ता.२२ ः येथील मळी परिसरात असणाऱ्या तळीमध्ये शेतकऱ्यांना मगर आढळून आली. मगर सहा ते आठ फूट लांब आहे. यामुळे तळीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रांगोळी गावापासून एक किलोमीटरवर शेततळी आहे. महापुराच्या काळात नदीपात्रातून ही मगर या तळीमध्ये आली आहे. महापुराचे पाणी उतरल्यानंतर तिला बाहेर जाता आले नाही. दररोज ही मगर तळीच्या काठावर असणाऱ्या शेतात येते. काठावरील शेतीमध्ये काही शेतकरी गवत कापणी करीत होते. यावेळी तळीमधून मगर बाहेर येत असल्याचे आढळले. यावेळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना याबाबत माहिती दिली. तळीमध्ये दररोज महिला धुणे धुण्यासाठी येतात. तसेच शेतकरी जनावरांना पाणी पाजण्यासाठी व धुण्यासाठी उतरतात. मासेमारी करण्यासाठी बाहेरून लोक येथे येतात. त्यामुळे मगरीकडून शेतकऱ्यांच्या जीवितास धोका होऊ शकतो. तरी वनविभागाने मगरीचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
.............