रांगोळीतील सात कॉर्नर वाहतुकीस धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रांगोळीतील सात कॉर्नर वाहतुकीस धोकादायक
रांगोळीतील सात कॉर्नर वाहतुकीस धोकादायक

रांगोळीतील सात कॉर्नर वाहतुकीस धोकादायक

sakal_logo
By

00272
रांगोळी ः येथील वाहतुकीस धोकादायक झेंडा चौकातील कॉर्नर.
-------------
रांगोळीतील सात कॉर्नर वाहतुकीस धोकादायक
संरक्षक भिंत, कठडे, दिशादर्शक फलकाअभावी अपघात; लोकवस्तीमुळे अडचण
संतोष कमते ः सकाळ वृत्तसेवा
रांगोळी, ता. २६ ः निढोरी ते हेरवाड या राज्यमार्गावर रांगोळी गाव आहे. कित्येक दिवस हा रस्ता रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. गावातून बाहेर पडण्यासाठी येथील रस्त्यावर सात कॉर्नर आहेत. या कॉर्नरवर कोणतीही संरक्षक भिंत, कठडे किंवा दिशादर्शक फलक नाही. तसेच रस्ता अरुंद असल्यामुळे अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. परिसरात औद्योगिक वसाहत, साखर कारखाने असल्यामुळे रहदारीचे प्रमाण जास्त आहे. हा रस्ता लोकवस्तीतून गेल्यामुळे वाहतुकीसाठी अडचणीचा आहे. कॉर्नर अरुंद असल्यामुळे धोकादायक बनत आहेत.
मायकल कॉर्नर ः हुपरीकडून येताना या कॉर्नरवर दोन्ही बाजूला ऊसाची शेती असल्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. यामुळे अपघात होऊन अनेकांनी येथे जीव गमावला आहे. हा कॉर्नर मृत्यूचा सापळा बनला आहे.
माळभाग कॉर्नर ः माळभाग परिसरात हा कॉर्नर वळणदार व एका बाजूला खचल्यामुळे वाहनधारकांना याचा अंदाज येत नाही. येथे बसस्थानक आहे.
सोसायटी कॉर्नर ः गावभागाच्या सुरवातीला असणारा हा कॉर्नर पूर्णपणे वळणदार आहे. यातच दोन्ही बाजूला नागरी वस्ती आहे. येथे अनेक वाहनधारकांना कॉर्नरचा अंदाज न आल्याने अपघात झाले आहेत.
बसस्थानक कॉर्नर ः गावाचा मेन चौक येथे असणाऱ्या कॉर्नरवर बसस्थानक, मुलींची शाळा व व्यापारी मोठ्या प्रमाणात आहेत.
झेंडा चौक कॉर्नर ः झेंडा चौक परिसरात असणारा कॉर्नर अरुंद व पूर्णपणे वळणादार आहे. तसेच रस्त्यालगत सार्वजनिक बांधकाम विभागाची मोठी सारण गटर आहे. येथे दोन वाहने पास होत नाही.
शिंगाडी यांचे घरासमोरील कॉर्नर झेंडा चौकाच्या पुढे असणारा हा कॉर्नर पूर्णपणे वळणदार आहे. समोरून येणारे कोणतेही वाहन येथे दिसत नाही. तसेच येथे जुने मोठे चिंचेचे झाड आहे. ते पूर्णपणे रस्त्यावर झुकलेले आहे.
मरगुबाई मंदिरसमोरील कॉर्नर ः हुपरीकडून जाताना शेवटचा व इचलकरंजीकडून येताना लागणार कॉर्नर याच्या मधोमध पिंपळाचे झाड आहे. एका बाजूला नागरी वस्ती व दुसऱ्या बाजूला सारण गटर व विहीर आहे. यासाठी गाच्या बाहेरून रस्ता होणे गरजेचा आहे. यामुळे होणारी वाहतूककोंडी व अपघात टाळता येणार आहेत.
-------------
हा रस्ता रुंदीकरण करताना अशा कॉर्नर ठिकाणी संरक्षक भिंत साईड गार्ड तसेच दिशादर्शक फलक बसवण्यात येतील.
-अविनाश वायचळ, शाखा उपभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग हातकणंगले.
---------------
कॉर्नरवर अपघात होऊन अनेकांनी जीव गमावला आहे. दररोज वाहतूक कोंडी होत आहे. रस्ता गावाच्या बाहेरून होणे गरजेचा आहे.
-शिवाजी सुर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य, रांगोळी