रांगोळीत बांधकाम कामगारांचा मेळावा

रांगोळीत बांधकाम कामगारांचा मेळावा

Published on

00419
रांगोळी ः येथील बांधकाम कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.
--------------
रांगोळीत बांधकाम कामगारांचा मेळावा
रांगोळी, ता. १० ः येथील पांडुरंग मंदिरामध्ये परिसरातील बांधकाम कामगारांचा मेळावा झाला. यामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती बांधकाम कामगारांना देण्यात आली. मेळाव्याचे उद्‍घाटन पुंडलिकराव जाधव, सरपंच संगीता नरदे, रजनीकांत माने यांच्या हस्ते झाले.
महाराष्ट्र शासनातर्फे बांधकाम कामगारांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ कामगारांना मिळवून देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पुंडलिक जाधव यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यामध्ये शैक्षणिक, वैद्यकीय, विमा, कर्ज प्रकरण, घरकुल तसेच बांधकाम कामगाराच्या पत्नीसाठी असणाऱ्या योजना अशा १९ योजनांची माहिती देण्यात आली. योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. बांधकाम कामगार महिलांनी यातील अनेक योजनांची माहिती नसल्याची खंत व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत माने यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रत्येक वर्षी नोंदणीचे नूतनीकरण करणे अनिवार्य असल्याचे सांगितले. सरपंच संगीता नरदे, ग्रामपंचायत सदस्य हुमायून मुल्लाणी यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायत सदस्य किरण कमते, विनय मोरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक किरण हावलदार यांनी केले. अमित माने यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.