विज्ञान प्रदर्शन स्तुत्य उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विज्ञान प्रदर्शन स्तुत्य उपक्रम
विज्ञान प्रदर्शन स्तुत्य उपक्रम

विज्ञान प्रदर्शन स्तुत्य उपक्रम

sakal_logo
By

01636
माणगाव ः येथे सुवर्ण महोत्सवी विज्ञान प्रदर्शनाच्या उद्‍घाटनप्रसंगी गजानन उकिरडे यांनी मार्गदर्शन केले. (छायाचित्र : बुद्धी गवळी)

विज्ञान प्रदर्शन स्तुत्य उपक्रम
गजानन उकिरडे; माणगावमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे उद्‍घाटन
रुकडी, ता. २४: विज्ञान प्रदर्शन हा स्तुत्य उपक्रम आहे. बालवैज्ञानिकांच्या सृजनशीलतेला विज्ञान प्रदर्शनातून संधी मिळते, असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी गजानन उकिरडे यांनी केले.
ते माणगाव (ता.हातकणंगले) येथे ए. पी. मगदूम हायस्कूल आणि हातकणंगले पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुवर्ण महोत्सवी विज्ञान प्रदर्शनाच्या उद्‍घाटनप्रसंगी बोलत होते. प्रदर्शनामध्ये हातकणंगले तालुक्यातून २०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. विद्यालयाच्या प्राचार्या महानंदा कदम यांनी स्वागत केले. गट शिक्षण अधिकारी जगन्नाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या विविध संघटना, पतसंस्थेचे पदाधिकारी तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.