
रुई-इंगळी रस्ते कामाला अखेर मिळाला मुहुर्त
00122
रुई : रुई-इंगळी हा अर्धवट स्थितीतील रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली. (छायाचित्र : मनोज अथणे, रुई)
रुई-इंगळी रस्ते कामाला अखेर मुहुर्त
रुई : मागील अनेक महिन्यापासून रुई ते इंगळी हा रस्ता डांबरीकरनाविना अपूर्णच राहिला होता. त्यामुळे प्रवासशांतून संताप व्यक्त होत होता. याबाबत रुई-इंगळी रस्ता डांबरीकरण कधी? अशा मथळ्याथाली ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन रुई- इंगळी रस्त्याच्या डांबरीकरणाला अखेर मुहूर्त मिळाला आहे.
रुई-पट्टणकोडोली या मार्गावर अवजड वाहनासह इतर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते, पण या मार्गावरील रुई ते इंगळी या सुमारे चार किमी रस्त्याचे डांबरीकरण झालेच न्हवते. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचे हाल होत होते. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.