
रुई अपघात बातमी
घोडा वाचला,
पण ऊसाचा
ट्रँक्टर उलटला
रुई ता.१० ः रुई ते पट्टणकोडोली मार्गावर नदीलगत रस्त्यावर फिरणाऱ्या घोड्याला चुकवण्याच्या प्रयत्नात ऊसाने भरलेला ट्रॅक्टर आणि ट्रॉली उलटली. अपघातात ट्रॅक्टरखाली डकल्याने चालक गणेश संजय केकले ( वय ३०, रा. दानोळी, ता. शिरोळ) गंभीर जखमी झाला. गावकऱ्यानी शर्थीच्या प्रयत्नांनी बाहेर काढल्याने त्याला जीवनदान मिळाले.
उसाच्या कांड्याने भरलेल्या ट्रॅक्टरट्रॉली घेऊन चालक गणेश हे कुंभोजहुन जवाहर कारखान्याकडे निघाले होते. बुधवारी रात्री साडेआठ वाजता रुई- पट्टणकोडोली कोडोली मार्गावरील नदीजवळ मगदूम विहिरी जवळील वळणावर रिकामे फिरणारे घोडे हे ट्रॅक्टरच्या आडवे आले, त्याला चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर आणि दोन ट्रॉली
वीस फूट खोल सारणीमध्ये जाउन उलटली. गावातील तरुणानी धाडसाने सारणीत उतरून ट्रॅक्टरखाली उसाच्या कांड्यामध्ये सापडलेल्या चालक केकले याला बाहेर काढले. त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केल.