सिद्धनेर्ली सत्कार बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धनेर्ली सत्कार बातमी
सिद्धनेर्ली सत्कार बातमी

सिद्धनेर्ली सत्कार बातमी

sakal_logo
By

02565
छायाचित्र ः सिद्धनेर्लीत लक्ष्मण पोवार यांच्या सत्कारवेळी मान्यवर.
----------

लक्ष्मण पोवार यांचा सत्कार
सिद्धनेर्ली ः येथे राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका केंद्रातर्फे लक्ष्मण पोवार यांची एमपीएससी परीक्षेतून एक्साइज पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला. अध्यक्षस्थानी प्रा. आनंदा पाटील होते. लक्ष्मण पोवार म्हणाले, ‘जिद्द, चिकाटी, परिश्रमात सातत्य असेल तर यशस्वी व्हाल. पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही तरी खचू नका. यश मिळेपर्यंत प्रयत्न करा.’ यावेळी गणेश मगदूम, पराग डोंगळे, पंकज मगदूम, नीलेश पोवार, पूनम साळवी, स्नेहल माने, मयुरी पाटील यांची भाषणे झाली. यावेळी डाॕ. मनोज आगळे, अतुल कांबळे, सावंत, अमर पाटील, रिद्धी मगदूम, सुप्रिया साजणे, सानिका मगदूम, प्रियांका गिरी, गणेश उबाळे उपस्थित होते. ज्ञानदीप एज्युकेशन संस्थाध्यक्ष डाॕ.अशोक पोवार यांनी स्वागत, गीतांजली बारवाडे यांनी सूत्रसंचालन केले. सौरभ माने यांनी आभार मानले.