करनूर मॕरेथाॕन स्पर्धा बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करनूर मॕरेथाॕन स्पर्धा बातमी
करनूर मॕरेथाॕन स्पर्धा बातमी

करनूर मॕरेथाॕन स्पर्धा बातमी

sakal_logo
By

प्रधान किरूळकर मॅरेथॉनमध्ये प्रथम
सिद्धनेर्ली ः करनूर (ता. कागल) येथील मॕरेथाॕन स्पर्धेत पुरुष गटात धामोडच्या प्रधान किरुळकरने प्रथम क्रमांक पटकावला. शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन बेळगाव जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती पंकज पाटील यांनी केले. बक्षीस वितरण कृष्णराज महाडिक, उद्योगपती अजिंक्य कदम यांच्या हस्ते केले. स्पर्धेत दुसरा क्रमांक इचलकरंजीच्या अनिकेत माने तर कोल्हापूरच्या अंकुश पाटील यांने तिसरा क्रमांक पटकाविला. मुलींच्या गटात अर्जुनवाडच्या गौरी वागरेने प्रथम क्रमांक तर केनवडेच्या साक्षी पाटील व ऋतुजा तळेकर यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. माजी सरपंच कविता घाटगे, राजाराम खराडे, आनंदा पाटील, कुमार पाटील, सुनील गुदले, कृष्णा धनगर, सतीश पाटील, अमोल खोत, संभाजी पाटील, गणपती चौगुले, तानाजी शिंदे, लक्ष्मण भंडारे, जयपाल चौगुले, जयसिंग घाटगे, बिरू धनगर, ओंकार भोसले, राहुल कोरे, अशोक गुदले, महेश चौगुले, राहुल पाटील, ओम घाटगे उपस्थित होते.