Tue, March 21, 2023

करनूरमध्ये आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा बातमी
करनूरमध्ये आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा बातमी
Published on : 13 February 2023, 3:07 am
करनूरमध्ये आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा
सिद्धनेर्ली : डॉ. आंबेडकर शेती विकास संशोधन संस्था व पंचायत समिती कागल, युनिसेफ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत करनूर यांच्या सहकार्यातून करनूर (ता. कागल) येथील करनूर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे ग्रामस्तर आपत्ती व्यवस्थापन नियोजन कार्यशाळा पार पडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेती विकास संशोधन संस्था, पंचायत समिती, युनिसेफ संस्था व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा झाली. आपत्ती व्यवस्थापनविषयी महेश भोई, अमोल कदम, अक्षय कांबळे, कुसुम गायकवाड, पूजा हजारे यांनी माहिती दिली. एस. बी. रामशे यांनी स्वागत केले. वैभव आडके यांनी प्रास्ताविक केले. एस. ई. तोडकर यांनी सूत्रसंचालन केले. बी. एस. मगर यांनी आभार मानले.