Sat, April 1, 2023

सिद्धनेर्लीच्या निसर्ग व पर्यावरण संघटनेस पुरस्कार बातमी
सिद्धनेर्लीच्या निसर्ग व पर्यावरण संघटनेस पुरस्कार बातमी
Published on : 14 February 2023, 3:08 am
निसर्ग व पर्यावरण संघटनेस पुरस्कार
सिद्धनेर्लीः येथील निसर्ग व पर्यावरण संघटनेस सह्याद्री संविधानिक आदर्श संघटना पुरस्कार जाहीर झाला. येथील नागरिकांनी लोकवर्गणी व लोकसहभागातून हाती घेतलेल्या वृक्षारोपण व संगोपन उपक्रमाची दखल घेत सह्याद्री फिल्म ॲन्ड इव्हेंट मॅनेजमेंटच्या १६व्या वर्धापनदिनानिमित्त कलाश्री विलासराव वाईकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार दिला. पुरस्कार वितरण २५ फेब्रुवारीला जयसिंगपूरला सहकारमहर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात प्रदान करण्यात येईल. संघटनेस दोन वर्षात मिळालेला हा चौथा पुरस्कार आहे.