सांगवडेवाडी ता.25

सांगवडेवाडी ता.25

01501

नरसिंह-लक्ष्मी
यात्रा सांगवडेत
आजपासून सुरू

सांगवडेवाडी ः महाराष्ट्र, कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सांगवडे (ता. करवीर) येथील श्री नरसिंह लक्ष्मी चैत्र यात्रेस शुक्रवार (ता. २६) पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त ग्रामपंचायत आणि श्री नरसिंह देव देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिर परिसराबरोबर गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. चार दिवस दुपारी अन्नछत्राची व्यवस्था करण्यात आलेली आहे. श्री नरसिंहाची पहिली पालखी शुक्रवारी (ता. २६) ला रात्री दहा वाजता आरतीनंतर निघेल. शिवाजी चौक पीटीएम चौक येथे चौथऱ्यावर बसणार आहे. शनिवारी (ता. २७) ला दुसरी पालखी हनुमान चौक येथे तिसरी पालखी रविवारी (ता. २८) ला चावडी चौक येथे असेल. या दिवशी भर यात्रा भरते. चौथी पालखी सांगवडेवाडीतील ग्रामस्थांची असून शिवाजी चौक येथे असणार आहे. पालखी बसल्यानंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सासनकाठी नाचवणे स्पर्धेचही आयोजन करण्यात आले आहे.
सर्व पालखी सोहळा शिस्तबद्ध होण्यासाठी ग्रामपंचायत आणि श्री नरसिंह देव देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी प्रयत्न करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com