

00079, 00078
शिंगणापूर : कसबेकर पार्कमध्ये गटारी झाल्या नसल्याने सांडपाणी तुंबण्याचे प्रकार वारंवार घडतात.
कसबेकर पार्कमध्ये प्रतीक्षा
रस्ते, गटारींची
सांडपाणी तुंबण्याचे प्रकार; रोगराईचा धोका
विवेक पाटील : सकाळ वृत्तसेवा
शिंगणापूर, ता. ३ : फुलेवाडी रिंगरोडला लागून असलेल्या कसबेकर पार्क व जयभवानी कॉलनी परिसरात अद्याप गटारी, रस्ते झालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा परिसर नागदेववाडी ग्रामपंचायतीच्या परिक्षेत्रात येतो. याबाबत कार्यवाही व्हावी, अशी मागणी होत आहे.
शिंगणापूर रोडनजीक असलेल्या कसबेकर पार्क व जयभवानी कॉलनी निर्माण झाल्यापासून एकदासुद्धा या भागात गटारी व रस्ते झालेले नाहीत, अशा स्वरूपाच्या येथील भागातील नागरिकांच्या व्यथा आहेत. गटारी नसल्याने सांडपाणी तुंबले आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका येथे असतो. डेंग्यू, हिवताप अशा गंभीर आजारांचे प्रमाण जास्त आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कार्यवाही होताना दिसत नाही, असे मत येथे नागरिकांचे आहे. या कॉलनीतील मतदान नागदेववाडी ग्रामपंचायतीला नसले तरी ग्रामपंचायत प्रशासन म्हणून आपल्या भागातील कॉलन्यांचा विकास करणे व नियमित स्वच्छता राखणे गरजेचे आहे, असे मत रहिवाशांचे आहे.
-------------------
कोट
00086
गटारींच्या दुर्गंधीने लहान मुले आजारी पडत आहेत. अस्वच्छतेने कॉलनीत डेंग्यू, मलेरियाची साथ पसरली आहे. गटारी नसल्याने सांडपाणी तुंबून रस्त्यावर येते. ग्रामपंचायतीने गटारी कराव्यात.
- लक्ष्मी प्रभावळे
----------------
00085
कोरोनानंतर निवडणुका झालेल्या नसल्याने निधी नाही. नागरिकांनी ग्रामपंचायतीत येऊन तक्रारी नोंदवाव्यात याची नक्की दखल घेतली जाईल.
- रवींद्र पोतदार, सरपंच
---------------
00082
विकासकामे का करत नाही? अशी ग्रामपंचायत सदस्यांकडे विचारना केली असता, तुम्ही ग्रामपंचायतीला मतदान लावून घ्या. आम्ही विकासकामे करतो, असे लोकप्रतिनिधी सांगतात.
- ॲड. शरद गोटम
------------
00083
खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गाडी घसरून अपघात होत आहेत. यातून अनेकांना गंभीर इजा होत आहेत. याची ग्रामपंचायतीने दखल घेऊन रस्ता करावा.
- सचिन अथणीकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.