खांडसरी नजिक दत्तनगरात गळतीच्या पाण्याने बगिचा फुलला

खांडसरी नजिक दत्तनगरात गळतीच्या पाण्याने बगिचा फुलला

00186
दत्तनगरमध्ये शुद्ध पाणी गटारात

सकाळ वृत्तसेवा

शिंगणापूर, ता. ४ : कोल्हापूर महापालिका हद्दीत येणाऱ्या शिंगणापूर रोडवरील खांडसरीनजीक दत्तनगरमध्ये ६ महिन्यांपासून मुख्य पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागली आहे. शुद्ध पाणी गटारात जात आहे. वारंवार कल्पना देऊनही महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. तातडीने पावले उचलून गळतीतून दत्तनगरला मुक्त करावे, अशी परिसरातील लोकांची मागणी आहे.
महानगरपालिका प्रभाग क्र. ५१ लक्षतीर्थ वसाहतनजीक चंबुखडी परिसरातील दत्तनगर कॉलनीत काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे काम सुरू झाल्यापासून पिण्याच्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनला गळती आहे. कित्येकदा पाणीपुरवठा विभागाला वारंवार कल्पना व तक्रार देऊनही पालिका प्रशासनाने पाऊले उचलली नाहीत. परिसरात सकाळी साडेसहा ते नऊ पाणीपुरवठा केला जातो. कॉलनीची लोकवस्ती ३५० च्या घरात असून फक्त अडीच तास पाणीपुरवठा प्रशासनाकडून होत असल्याने संपूर्ण कॉलनीला पुरेसे पाणी मिळत नाही. भर म्हणून की काय कॉलनीच्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. ही गळती भूमिगत असल्याने आहे. या गळतीकडे ६ महिने प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गळतीजवळ असलेल्या खड्ड्यात शुद्ध पाणी जमिनीत मुरून शेवाळ, जलपर्णी, यासह विविध फुले जलवाहिनी गळतीच्या पाण्यावर वाढू लागली आहेत. सोबत पाईपलाईनला गळती असलेल्या ठिकाणीच सांडपाण्याचे गटार असल्याने जलवाहिनीमधील शुद्ध पाणी थेट गटारीत मिसळून पाण्याची नासाडी होत आहे. सोबत खड्ड्यात साचलेल्या शुद्ध पाण्याचा मुबलक पुरवठा झाल्याने जलपर्णीची वाढून डेंगी, मलेरियासारखे रोग पसरत आहेत. या प्रकरणात आयुक्तांनी वेळीच लक्ष घालून पाण्याची गळती काढण्याचे आदेश द्यावेत व दररोज हजारो लिटर गटारीत मिसळणारे शुद्ध पाणी वाचवून दत्तनगरवासीयांची पाण्याची समस्या सोडवावी, अशी कॉलनीतील लोकांची मागणी आहे.

कोट
00190
शहरातील अनेक ठिकाणी लोक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करत आहेत. इथे दररोज हजारो लिटर पाणी गटारात जात आहे
- मंगल पाटील, गृहिणी

75393
दारातच शुद्ध पाणी गटारीत जाताना बघून जीव हळहळतो. निद्रिस्तावस्थेत असलेल्या प्रशासनला कोण जाग आणणार?
- संदीप सातपुते

75391
महापालिका प्रशासनाने आमच्याच नव्हे तर इतरही भागांत असणाऱ्या गळतीसाठी स्वतंत्र पथक नेमून गळतीतून वाया जाणारे पाणी वाचवावे
- गीतांजली कदम

75392
ऐन कडक उन्हाळ्यात लोक पाण्यासाठी तडफडत आहेत. असे असताना शुद्ध पाणी गटारीत जात आहे. दुरुस्तीविषयी उदासीनता का?
- अमित टिपुगडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com