टू ५

टू ५

00325

बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
डी मार्ट ते जावळाचा गणपती मार्ग ; एकेरी वाहतुकीची मागणी

सकाळ वृत्तसेवा

शिंगणापूर, ता. ६ : फुलेवाडी भगवा चौक बस स्टॅन्ड रहदारीचा व पर्यटनाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. हा मार्ग शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. पण डी मार्ट ते जावळाचा गणपती दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्त वाहन पार्किंगमुळे रहदारी ठप्प होत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
कोल्हापूर-गगनबावडा मार्गाने शहरात प्रवेश करताना फुलेवाडी भागवा चौक ते रंकाळा दरम्यान चारपदरी रस्ता आहे. रंकाळ्यावर सायंकाळी सहानंतर प्रवाशांची गर्दी असते. रंकाळा पाहण्यासाठी येणारे पर्यटक चारचाकी व दुचाकी गाड्या रंकाळा पदपथाच्या बाजूने रस्त्यातच पार्किंग करत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. डी मार्टच्या बाजूने असणारा पदपथ गायबच असल्याने वाहने रस्त्यातच लावलेली असतात.
सायंकाळी सहानंतर शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या असते. रंकाळ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांचा बेशिस्त पार्किंगमुळे तासन् तास रहदारी ठप्प झालेली पाहायला मिळते. यावर वाहतूक नियंत्रण विभागाकडून कोणतीच उपाययोजना केली जात नाही. फोन केल्यावरच वाहतूक पोलिसांना पाचारण केले जाते. रंकाळ्यावर डी मार्टच्या समोर असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर पर्यटक दुचाकी गाड्या रस्त्याच्या बाजूला लावून जात असल्याने येथून चारचाकी, दोन अवजड वाहने जाऊ शकत नाहीत. याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते.

चौकटीत घ्या
रुंदीकरणासह सिग्नल सुरू करा
रंकाळा टॉवर परिसरात वाहतुकीची कोंडी हा गंभीर प्रश्न वाहतूक शाखेसमोर असल्याने यावर उपाययोजना करण्यासाठी परिसराचे रस्ता रुंदीकरण गरजेचे आहे. जावळाचा गणपतीच्या दारात असलेला बंद सिग्नल सुरू करणे किंवा गगनबावडा महामार्गाकडे जाताना रंकाळा स्टँड ते रंकाळा टॉवर सर्व वाहनांना एकेरी वाहतूक करून यावर कायमचा तोडगा निघू शकतो का यासाठी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख यांनी संयुक्त बैठक घेण्याची आवश्यकता आहे.

कोट
00329
कामावरुन घरी जाताना दररोज रहदारी ठप्प होत असल्याने त्रास होतो. अनेकदा वाहने एकमेकाला घासल्याने वादाचा प्रसंग पाहायला मिळतो. यावर उपाययोजना करायला हवी
-अवधूत मरळकर, गगनबावडा महामार्ग प्रवासी.
00328
सायंकाळी पर्यटक चारचाकी, दुचाकी वाहने मुख्य रस्त्याच्या बाजूने पार्किंग करत असल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने रंकाळा स्टँड ते रंकाळा टॉवर एकेरी वाहतूक करावी
- शंकर पाटोळे, रिक्षा व्यावसायिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com