सकाळ इम्पॅक्ट, खांडसरी - फुलेवाडी भगवा चौक गगनबावडा १६६ जी महामार्गाचे रुंदीकरण काम रात्री देखिल सुरू

सकाळ इम्पॅक्ट, खांडसरी - फुलेवाडी भगवा चौक गगनबावडा १६६ जी महामार्गाचे रुंदीकरण काम रात्री देखिल सुरू
Published on

00962
महामार्ग रुंदीकरणाचे काम रात्रीही
फुलेवाडी जकात नाका परिसरातील चित्र

सकाळ वृत्ताचा परिणाम

शिंगणापूर, ता. १० : फुलेवाडी जकात नाका परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या पाण्याच्या टँकरने फुलेवाडीतील दत्तनगरातील वृद्धाला चिरडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. यावर ‘सकाळ’ने ''दीड महिन्यांत शंभर मीटरचेच काम'' असे वृत्त प्रसारित केल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले. याची दखल घेत सोमवारी (ता. ९) रात्री ८ च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने खांडसरी - फुलेवाडी भगवा चौक रस्ता रुंदीकरणाचे काम रात्रीही सुरू ठेवल्याचे पाहायला मिळाले.
कोल्हापूर - गगनबावडा कोकण व गोव्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गाचे काम फुलेवाडी भगवा चौक - खांडसरी पट्ट्यात दीड महिन्यांपासून सुरू आहे. याचा फटका पादचारी तसेच दुचाकीस्वारांना बसला. अनेकजण संथ कामामुळे अपघात होऊन जखमी झाले. तिघेजण मृत्युमुखी पडले. या मार्गावर वाहतूक कोंडी प्रचंड होते. सोमवारी सायंकाळी वाहनांची रहदारी कमी झाल्यावर रात्री ८ च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने दीड महिना रखडलेले खांडसरी - फुलेवाडी भगवा चौक महामार्गाचे काम हॅलोजन लाईट लावून गतीने सुरू केले. रोज रात्री महामार्गाचे काम पहाटेपर्यंत सुरू ठेवले तर लवकर हे काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. तिघे जीवास मुकल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खडबडून जागे झाल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com