
उपसरपंच निवड साेबत फाेटाे
02993
अजित पाटील कौलवचे उपसरपंच
शाहूनगर ः कौलव (ता. राधानगरी) ग्रा.पं. उपसरपंचपदी चंद्रकांत पाटील-काैलवकर गटाचे अजित राजाराम पाटील (म्हाकवेकर) यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवड झाली. विस्ताराधिकारी एन. आर. जमदाडे निरीक्षक होते. निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील मसलिंग ग्रामविकास आघाडीने सरपंचपदासह सहा जागा जिंकल्या होत्या. उपसरपंच अजित पाटील यांचा सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी ओमसाई उद्योग समूहाचे संस्थापक चंद्रकांत पाटील-काैलवकर, माजी सरपंच सविता चरापले, मनाेज पाटील, आबाजी पाटील, शिवाजी पाटील, अण्णाप्पा चाैगले, रंगराव पाटील, संभाजी पाटील, प्रकाश हुजरे, सुरेश थाेरात, नामदेव पाटील, तुषार पाटील, अक्षय चरापले, सदस्य, ग्रामसेवक एस. डी. आरडे, तलाठी अशोक पाटील, पोलिसपाटील डी. एस. कांबळे उपस्थित होते. विजयानंतर श्री. पाटील यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली.