पान ७ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ७
पान ७

पान ७

sakal_logo
By

03070
कुरूकलीत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन
शाहूनगर ः महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनाला कुरुकली (ता. करवीर) येथील भोगावती महाविद्यालयात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २००५ नंतर सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे त्वरित भरावीत यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी सकाळी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवून ठिय्या आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. आंदोलनात संघटनेचे उत्तम पाटील, दशरथ जाधव यांच्यासह कर्मचारी सहभागी होते.