कौलवला भारुड कार्यक्रम

कौलवला भारुड कार्यक्रम

03738
कौलव : येथील रविविहार दत्त मंदिरात झालेल्या कार्यक्रमात भारुड सादर करताना नेताजी डोंगळे.
......
कौलवला भारुड कार्यक्रम
शाहूनगर, ता. ४ ः कौलव (ता. राधानगरी) येथील रविविहार दत्त मंदिर बुवाचे पूल येथे तुकाराम बीज आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराज नाथ षष्ठीनिमित्त नेताजी डोंगळे यांच्या भारुडाचा कार्यक्रम झाला. यावेळी डोंगळे यांनी संत शिरोमणी एकनाथ महाराजांची अध्यात्म आणि भक्ती, प्रपंच अणि परमार्थ, प्रबोधन आणि मनोरंजन करणारी मानवतेची, समतेची शिकवण देणारी वासुदेव, पिंगळा, विंचू, दादला, रोडगा, भागाबाई, फू बाई फू अशी लोकप्रिय भारुडे सादर केली. ढोलकीवादक विवेक धामोडकर, हार्मोनियमवादक सागर ढेरे आणि घोटवडे येथील दत्त प्रासादिक भजनी मंडळाचे कलाकार केरबा ढेरे, शंकर डोंगळे, दयानंद डोंगळे, नामदेव डोंगळे, गोटू पाटील, विघ्नेश कांबळे, संस्कार कोळी यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी मंदिराचे व्यवस्थापक बळी पाटील सिरसेकर महाराज, सुहास पाटील, गंगाराम पाटील, बापूसाहेब डोंगळे यांच्यासह भाविक उपस्थित होते.
.............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com