प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उज्ज्वल यश

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उज्ज्वल यश

03800
साक्षी लिंगडे
....
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उज्ज्वल यश

शाहूनगर, ता. २३ ः प्रतिकूल परिस्थितीबद्दल तक्रार न करता जिद्दीने ध्येय गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्या राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवडे येथील साक्षी सुरेश लिंगडे या शेतकऱ्याच्या मुलीने बारावीच्या परीक्षेत ८६.१७ टक्के गुण मिळवून कुरुकली केंद्रात प्रथम क्रमांक पटकाविला. कोणताही खासगी क्लास नसताना आई-वडिलांची अपेक्षा पूर्ण करीत तिने मिळवलेल्या या यशाचे कौतुक होत आहे.
साक्षी ही कुरुकली येथील भोगावती महाविद्यालयात बारावीच्या कला शाखेत शिकत होती. घरची आर्थिक परिस्थिती बेताची. वडील अल्पभूधारक शेतकरी. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही अथक परिश्रमाने साक्षीने हे यश मिळविले. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, प्रत्येक संधीचे सोने करण्याची वृत्ती, नियमित अभ्यास व जिद्द या जोरावर साक्षीने हे यश मिळवले. वर्गातील नियमित उपस्थिती, दररोजचा अभ्यास, अभ्यासाच्या वेळेचे योग्य नियोजन व शिक्षकांचे मार्गदर्शन या गोष्टी तिच्या यशात महत्त्वाच्या ठरल्या. प्रतिकूल परिस्थितीचे भांडवल न करता एक विशिष्ट ध्येय समोर ठेवून वाटचाल केल्यास निश्चित यश मिळते, असे साक्षीने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. आपल्या यशात आई-वडील, बहीण, शिक्षक यांचा मोठा वाटा असल्याचे सांगून भविष्यात पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न असल्याचे तिने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com