परिते-कुरुकली दरम्यानच्या पुलावरील रस्त्याची दुरुस्ती

परिते-कुरुकली दरम्यानच्या पुलावरील रस्त्याची दुरुस्ती

3833
कुरुकली : कुरुकली ते परिते दरम्यान असणाऱ्या नवीन पुलावरील रस्त्याच्या दुरुस्तीसह डांबरीकरण करण्यात आले आहे. (छायाचित्र : सुहास जाधव, कौलव)
...
लोगो ः सकाळ इम्पॅक्ट

परिते-कुरुकली दरम्यानच्या
पुलावरील रस्त्याची दुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा
शाहूनगर, ता.७ ः कोल्हापूर-राधानगरी राज्यमार्गावरील परिते ते कुरुकली दरम्यान नवीन बांधलेल्या पुलावरील रस्त्याची दुरवस्था झाली होती. येथून वाहने चालविताना वाहनधारकांची कसरत होत असे. याबाबत ‘सकाळ’ने रस्ता दुरुस्तीचे वृत्त प्रसिद्ध केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती केल्याने वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.
कुरुकली ते परिते दरम्यानच्या रस्त्यावरील भोगावती कॉलेज विनंती बसथांब्याशेजारी असणाऱ्या ओढ्यावर नवीन पूल बांधला आहे. मात्र, या पुलावरील रस्त्याचे काम केलेले नव्हते. येथील रस्ता उखडून रस्त्यात मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे येथून वाहने चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. येथे किरकोळ अपघातही घडले होते. रस्ता दुरुस्तीचे वाहनधारकांकडून वारंवार मागणी केली जात होती. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात होते. रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ‘सकाळ’मधून छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करून येथे डांबरीकरण केले आहे. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय दूर झाल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com