
आमदार पी. एन पाटील वाढदिवसानिमित्य पुईखडी येथे ग्रामीण फुटबॉल स्पर्धला प्रारंभ.
01336
सोनाळी : फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन करताना राहुल पाटील, शारंगधर देशमुख, अश्विनी धोत्रे आदी.
ग्रामीण फुटबॉल स्पर्धेला
पुईखडीत प्रारंभ
सोनाळी, ता. ४ : आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या (केएसए) मान्यतेने झालेल्या पुईखडीतील ग्रामीण फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल पाटील, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, माजी पंचायत समिती सभापती अश्विनी धोत्रे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार पी.एन.पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फुटबॉल स्पर्धेने ग्रामीण खेळाडूंना नवसंजिवनी मिळणार आहे. स्पर्धेत ग्रामीण भागातील 22 संघांनी सहभाग घेतला आहे.
स्पर्धेचे यंदाचे आठवे वर्ष असून स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत. आमदार पी. एन पाटील यांच्या वाढदिनी प्रथम क्रमांक रुपये ९२९२, उपविजेत्या संघास रुपये ६३६३ व चषक देऊन आमदार पी. एन. पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात येईल. यावेळी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृष्णात धोत्रे, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रा. सुनील खराडे, माजी संचालक बी. ए. पाटील, बबनराव रानगे, संदीप पाटील, विजयराव भोसले, दिगंबर मेडसिगे, सरपंच शिवाजी रावळ, सागर टेळके उपस्थित होते.
आज रक्तदान शिबिर
सडोली खालसा ( ता. करवीर ) येथे आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (ता. ५) सकाळी ९ ते २ पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिर हरी रामजी पाटील सोसायटी हॉलमध्ये आहे. रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पी. एन. पाटील युवा मंचतर्फे केले आहे.