सभासदांच्या श्रमातून, त्यागातून उभारलेली भोगावती दुध संस्था शताब्दी पार करेल. आमदार पी.एन. पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सभासदांच्या श्रमातून, त्यागातून उभारलेली भोगावती दुध संस्था शताब्दी पार करेल. आमदार पी.एन. पाटील
सभासदांच्या श्रमातून, त्यागातून उभारलेली भोगावती दुध संस्था शताब्दी पार करेल. आमदार पी.एन. पाटील

सभासदांच्या श्रमातून, त्यागातून उभारलेली भोगावती दुध संस्था शताब्दी पार करेल. आमदार पी.एन. पाटील

sakal_logo
By

01348

भोगावती दूध संस्था
शताब्दी करेल ः आमदार पाटील
सोनाळी, ता. ११ ः सभासदांच्या श्रमातून, त्यागातून उभारलेली भोगावती सहकारी दूध संस्था नियोजनामुळे शताब्दी पार करेल, असे गौरवोद्गार आमदार पी. एन. पाटील यांनी काढले. सडोली खालसा (ता. करवीर) येथे भोगावती दूध संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी सभासद भेटवस्तू वाटप व स्मरणिका प्रकाशन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकूळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील होते.
आमदार पाटील म्हणाले, ‘जिल्हातील सहकारी संस्थांची अवस्था बिकट आहे. भोगावती दूध संस्था चांगली चालली आहे. या संस्थेचा आदर्श घ्यावा.’ गोकुळचे अध्यक्ष विश्वासराव पाटील म्हणाले, ‘गोकुळच्या योजनांचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा.’
यावेळी सभासदांना ३७५ वॉटरफिल्टर वाटप तसेच आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. यावेळी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, एकनाथ पाटील, बाळासाहेब साळोखे यांची भाषणे झाली. यावेळी गोकुळचे माजी संचालक उदय पाटील, सरपंच अमित पाटील, सुभाष पाटील, बाजीराव पाटील, विक्रम पाटील, प्रमोद पाटील, अशोक पाटील, सागर चव्हाण, विठ्ठल दिंडे, हिंदूराव बुवा, सचिव विजयराव पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन एकनाथ चौगले, प्रास्ताविक अध्यक्ष महादेव मगदूम, आभार निवास कुंभार यांनी मानले.