
केंद्रीयमंत्री जोतिरादित्य सिंधिया यांचे उपस्थित करवीर विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामाचे उद्घाटन व विविध पक्षातील हजारो कार्यकत्यांचा भाजप प्रवेश.
‘करवीर’मधील विकासकामांचे केंद्रीय
मंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्या उद्घाटन
सोनाळी ः केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री जोतिराज्यदित्य शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. मंगळवारी (ता. २८) करवीर विधानसभा मतदार संघातील काही गावांमध्ये विकासकामांचे उद्घाटन तसेच हळदी येथे २५ ते ३० गावातील विविध पक्षातील हजारो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश त्यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती करवीर तालुका भाजप अध्यक्ष हंबीरराव पाटील यांनी हळदी ( ता. करवीर ) येथील पत्रकार परिषदेत दिली. करवीर विधानसभा मतदारसंघातील काही गावांना भेट देणार आहेत. प्रति पंढरपूर नंदवाळ येथील विठ्ठल मंदिरास भेट देऊन दौऱ्याची सुरुवात होणार आहे. खासदार धनंजय महाडिक, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत घाडगे, सुरेश हळवणकर, राहुल चिकोडे उपस्थितीत राहणार आहेत. भोगावती कारखान्याचे संचालक दत्तात्रय मेडशिंगे, नामदेव पाटील, सतीश पाटील, कृष्णात भासले, प्रकाश पाटील,अक्षय वरपे, गोरखनाथ अधिगरे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते .