हळदी सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराबदल प्रशासनाकडे तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हळदी सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराबदल प्रशासनाकडे तक्रार
हळदी सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराबदल प्रशासनाकडे तक्रार

हळदी सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराबदल प्रशासनाकडे तक्रार

sakal_logo
By

हळदी सरपंच, ग्रामसेवक,
उपसरपंचांविरुद्ध तक्रार
---
पाच ग्रामपंचायत सदस्यांची माहिती
सोनाळी, ता. १ ः हळदी (ता. करवीर) येथील सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच यांच्या विरोधात पाच सदस्य व ग्रामस्थांनी ऑक्टोबरमधील ग्रामसभेला ग्रामस्थांनी सुचविलेल्या ठराव व चर्चा ग्रामसेवकांनी प्रोसिडिंगवर न घेता सरपंच व उपसरपंच सांगतील त्या पद्धतीने ग्रामसभेचा विरोध डावलून मनमानी कारभार केला, अशी टीका केली आहे. तसेच, सरपंच अपात्र असताना ८४ दिवसांच्या काळात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केला. त्याला ग्रामसभेने विरोध करून ठराव मांडला होता. तशी लेखी सूचना ग्रामसेवकांना दिली होती व त्यावर चर्चा होऊन कार्यवाही करावी, असा ठराव झाला होता. त्यांनी तो प्रोसिडिंगमध्ये लिहिला नाही, अशा कारभाराची तक्रार शासकीय विभागाकडे केली असल्याची माहिती पत्रकार बैठकीत दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची जागा ग्रामपंचायतीकडे वर्ग करून ग्रामपंचायत दप्तरी नोंद घातली होती. ती दिसून येत नाही. त्याची तक्रार ग्रामस्थ संजय जाधव यांनी आपल्याकडे व गटविकास अधिकारी, पंचायत समिती करवीर यांच्याकडे केली होती. नोंद कोणी रद्द केली, याचा खुलासा करून नोंद घालण्याची मागणी केली आहे. शंकर पाटील, सर्जेराव पाटील, संजय जाधव, बळवंत पाटील, सचिन पाटील, बाबासो पाटील उपस्थित होते.

कोट
मोजणीसाठी ग्रामपंचायतीने केलेला खर्च हा मासिक सभेला मंजूर करून घेतला आहे. न्यायालयीन दाव्यांचा खर्च सदरची दावे ग्रामपंचायत प्रतिवादी असल्याने ग्रामपंचायतीने केला आहे. विरोधकांनी क्रीडांगण न करता अपहार केलेल्या सात लाख रकमेचा केलेला कारभाराचा हिशेब त्यांनी द्यावा.
- विमल सुतार, सरपंच
- बाजीराव पाटील, उपसरपंच