वाशी येथील बिरदेव पाणीपुरवठा संस्थेची निवडणूक बिनविरोध. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाशी येथील बिरदेव पाणीपुरवठा संस्थेची निवडणूक बिनविरोध.
वाशी येथील बिरदेव पाणीपुरवठा संस्थेची निवडणूक बिनविरोध.

वाशी येथील बिरदेव पाणीपुरवठा संस्थेची निवडणूक बिनविरोध.

sakal_logo
By

बिरदेव पाणी पुरवठा संस्थेची निवडणूक बिनविरोध

सोनाळी ः वाशी (ता. करवीर) येथील बिरदेव सहकारी पाणी पुरवठा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. १३ जागांसाठी २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. संस्थेच्या हिताच्या दृष्टीने बैठकी व चर्चेतून मार्ग काढत जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष बाबूराव हजारे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयानी साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय हजारे, हर्षवर्धन साळुंखे यांच्या सहकार्यातून नूतन संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. सर्वसाधारण गट ः महादेव पाटील, संदीप पाटील, बाळकृष्ण पाटील, शोभा पाटील, शिवानी पाटील, लता पाटील, कल्पना पाटील, अनिल पुजारी. महिला प्रतिनिधीः इंदुबाई पाटील, हौसाबाई धनगर. इतर मागासवर्गः संभाजी कुंभार. भटक्या विमुक्त जातीजमाती ः रामचंद्र रानगे. अनुसूचित जातीजमाती ः अशोक लोखंडे या प्रतिनिधींची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनीषा भुईंगडे यांनी काम पाहिले. सचिव केशव पाटील यांनी आभार मानले.