वाशीतील  शेकडो  वारकरी आषाढीसाठी रवाना.

वाशीतील शेकडो वारकरी आषाढीसाठी रवाना.

Published on

02392
वाशीतील वारकरी आषाढीसाठी रवाना
सोनाळी : पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रेसाठी आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लाखो वारकरी, भाविक व मानकऱ्याच्या उपस्थितीत पायी नियोजित मार्गाने जाणार आहे. त्यासाठी वाशी (ता. करवीर) येथील वारकरी, ग्रामस्थ भक्तिभावात दिंडी सोहळा आळंदीच्या दिशेने वाटचाल करीत मार्गस्थ झाला. दरम्यान दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांची ग्रामस्थांनी गळाभेट घेत निरोप दिला. वारीमध्ये सुखरूप जाऊन सुखरूप परत येण्यासाठी आनंदाने शुभेच्छा दिल्या. दिंडी सोहळ्याचे पूजन माजी उपसरपंच अरुण मोरे, अण्णा बुडके यांच्या हस्ते झाले. यावेळी पांडुरंग कुईगडे, वसंत शेळके, कृष्णात पाटील, रंगराव रानगे, विलास पाटील, पांडुरंग शिंदे, अंजना बुडके, धोंडूबाई पाटील, बनाबाई रानगे, सुनंदाबाई कुईगडे यांच्यासह वारकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.