नंदवाळ आषाढी वारी यात्रेसाठी प्रशासन सज्ज.,

नंदवाळ आषाढी वारी यात्रेसाठी प्रशासन सज्ज.,

02400

नंदवाळ : येथे होणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणी आषाढी वारीची नियोजन बैठक विठ्ठल मंदिरात झाली. यावेळी बोलताना प्रांताधिकारी हरीष धार्मिक, तहसीलदार स्वप्नील रावडे, सरपंच अमर कुंभार, किशोर शिंदे, आदी.
...

नंदवाळ आषाढी वारी यात्रेसाठी प्रशासन सज्ज
प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विठ्ठल मंदिरात बैठक
सोनाळी, ता. ५ : श्री क्षेत्र प्रतिपंढरपूर नंदवाळ (ता. करवीर) येथे होणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणी आषाढी वारी यात्रेची नियोजन बैठक विठ्ठल मंदिरामध्ये झाली. विविध विभागांतील अधिकारी -कर्मचाऱ्यांना यात्रेदरम्यान नियोजनाची पार्श्वभूमी व जबाबदारी सांगून भाविकांना सुविधा देण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना प्रांताधिकारी हरीष धार्मिक यांनी दिल्या. यावेळी तहसीलदार स्वप्निल रावडे उपस्थित होते.
यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची दक्षता घेण्यासाठी पोलिस प्रशासन, आरोग्य, पाणी, स्वच्छता, महावितरण, महसूल विभाग, अग्निशमन दल यांसह विविध विभागांतील प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भाविकांच्या सेवेसाठी सतर्क राहण्याच्या सूचना धार्मिक यांनी दिल्या.
शांततापूर्ण दर्शन मिळण्यासाठी दर्शन रांग, स्वयंसेवक, मंदिर परिसर, गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, फिरती शौचालये ठेवण्याच्या सूचना तहसीलदार स्वप्‍नील रावडे यांनी दिल्या. वाशी, नंदवाळ मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवून व्हीआयपींना जैताळ मार्गे सोडण्यात येईल.
‘यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक बंदोबस्तासाठी २५० पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात असणार आहे. दिलेल्या सूचना, नियमांचे पालन करून ग्रामपंचायत, ग्रामस्थांनी सहकार्य करावे,’ असे आवाहन करवीरचे पोलिस उपविभागीय अधिकारी आप्पासो पवार यांनी केले. एसटी बस वगळता वाशी नाक्यावरून वाहतूक कळंबा, इस्पुर्ली, शेळेवाडी, परितेमार्गे कोकणात वळवण्यात येईल. तसेच हजारे पेट्रोलपंप, खत कारखाना येथे पार्किंगची व्यवस्था केली जाईल, असे वाहतूक पोलिस निरीक्षक एम. एस. पाटील यांनी सांगितले.
यावेळी करवीरचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, इस्पुर्ली पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक टी. जे. मगदूम, गटविकास अधिकारी विजय यादव, प्राथमिक आरोग्य केंद्र कणेरीचे डॉ. बी. एस. मस्के, कोल्हापूर ज्ञानेश्वर पालखीचे प्रमुख दीपक गौड, मंडल अधिकारी प्रवीण माने, महावितरणचे योगेश साळोखे, सरपंच अमर कुंभार, उपसरपंच तानाजी कांबळे, पोलिस पाटील विनायक उलपे, ग्रामसेविका प्रियंका पाटील, देवस्थानचे विश्वास पाठक, तलाठी रविराज खंडागळे, आदींसह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, वारकरी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com