Thur, March 23, 2023

बाळेघोलमधील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शूज वाटप
बाळेघोलमधील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शूज वाटप
Published on : 28 January 2023, 3:33 am
02012
बाळेघोलमधील शाळेत
विद्यार्थ्यांना शूज वाटप
सेनापती कापशी ः बाळेघोल (ता. कागल) येथील माजी उपसरपंच सुनील कोले यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त बाळेघोल पैकी रामपूरवाडी प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शूज व खाऊ वाटप केले. ते म्हणाले, ‘ग्रामीण विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडू नये, यासाठी त्यांना शैक्षणिक साहित्य, गुणवत्ता विकासासाठी हातभार लावावा.’ आर. एस. पाटील म्हणाले, ‘कोले नोकरीनिमित्त बाहेर असले, तरी त्यांची नाळ गावाशी जोडलेली आहे. म्हणूनच ते गावात उपक्रम राबवितात. त्यांना पाठबळ द्यावे. यावेळी उपसरपंच विकास जाधव, आण्णाहेब थोरवत, दत्तात्रय कोले, दादू यादव, पुंडलिक पोवार, रमेश पोवार उपस्थित होते. दरम्यान, बाळेघोल प्राथमिक शाळेतही खाऊ वाटप झाले.