
तिसरीत शिकणा-या मुलांकडून सुवर्ण अलंकाराचे पाकीट परत
02032
तिसरीत शिकणा-या मुलांकडून
सुवर्णालंकांराचे पाकीट परत
मुरगूड, ता. १८: कुरणी (ता. कागल) येथील प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरीत शिकणा-या प्रज्वल कांबळे व सौरभ सुतार या विद्यार्थांनी मुख्यरस्त्यावरील सोन्याच्या दुकानाजवळच सापडलेले सोन्याचे दागिने असलेले पाकीट परत केले. त्याबद्दल त्यांचे व शिक्षकांचे मगदूम कुटुंबियांनी कौतुक केले. हे तिसरीत शिकणारे विद्यार्थी शाळेकडे जाताना त्यांना रस्त्यात लहान पिशवी सापडली. त्यात सोन्याचे दागिने असल्याचे त्यांना आढळले. ती पिशवी त्यांनी दुकानदार सोनाराकडे दिली. ग्रामपंचायतीच्या स्पिकरवरुन पाकीटाबद्दल निवेदन केले. ते संगीता आनंदा मगदूम यांनी ओळख पटवून ताब्यात घेतले. वीस हजारांचे सोन्याचे दागिने परत देणा-या मुलांचा व संस्काराचे धडे देणा-या शिक्षकांचा मगदूम कुटुंबियांकडून सन्मान केला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसह उत्तम संस्काराबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पी. डी. रणदिवे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक नारायण कल्याणकर, किरण डाफळे, संतोष मेळवंकी, श्रीकांत गायकवाड, विठ्ठल हरीभाऊ पाटील, विठ्ठल शिवाजी पाटील, संदिप पाटील उपस्थित होते.