तमनाकवाडा, हणबरवाडीत पावसाने प्रचंड नुकसान  टोकणलेले बी बियाणे गेले वाहून

तमनाकवाडा, हणबरवाडीत पावसाने प्रचंड नुकसान टोकणलेले बी बियाणे गेले वाहून

02604, 02605
तमनाकवाडा : येथे शेती खचून ओढ्यातील दगड-गोटे शेतात साचले. दुसऱ्या छायाचित्रात पावसाने नुकसान झालेलल्या शेतीची समरजितसिंह घाटगे यांनी पाहणी कली. या वेळी नुकसानग्रस्त शेतकरी संतोष तिप्पे यांना अश्रू अनावर झाले.
(छायाचित्र : सार्थक फोटो, कापशी)
...


तमनाकवाडा, हणबरवाडीत
पावसाने मोठे नुकसान

टोकलेले बी-बियाणे गेली वाहून ः ओढ्यातील दगड-गोटे साचले शेतात

सेनापती कापशी, ता. ९ : काल दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने तमनाकवाडा, हणबरवाडी आणि बाळेघोल येथील शेतीचे मोठे नुकसान झाले. तमनाकवाडा येथील ‘गाणगुडगी’ व ‘चिमटा’ नावाच्या शेतातील ओढ्यातील पाणी थेट शेतात येऊन दोन दिवसांपूर्वी झालेल्या पेरणीचे बी-बियाणे वाहून गेले. याशिवाय जोराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती खचून नुकसान झाले.
तमनाकवाडा येथील विक्रम तिप्पे, संतोष तिप्पे, सदाशिव तिप्पे आदी शेतकऱ्यांच्या शेतातून थेट ओढ्याचे पाणी गेल्याने शेती खचून यामध्ये ओढ्यातील दगड -गोटे येऊन साचले आहेत. या नुकसान झालेल्या शेतीची पाहणी आज दुपारी भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी केली. या वेळी नुकसान पाहून संतोष तिप्पे यांना अश्रू अनावर झाले. महादेव तिप्पे, किरण तिप्पे, बाळू तिप्पे, दिनकर तिप्पे, शंकर तिप्पे, विकास तिप्पे, आकाताई मोरे, साताप्पा तिप्पे, बाबूराव तिप्पे यांच्या शेतीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून शेती खचली आहे. घाटगे यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा त्वरित करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी दिलीप तिप्पे, सागर मोहिते आदी उपस्थित होते. दरम्यान, तमनाकवाडा व हणबरवाडी दरम्यानच्या ओढ्याजवळ रस्ता खचल्याने पलीकडील शेतकऱ्यांची पाहणी अद्याप करता आलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com