सुधारित...ता. 13.09.2026 साठी मेतके येथील पूलावरुन वारंवार वाहनांच्या रांगा रुंदीकरणासह रस्ता आणि पूल होणार कधी ?

सुधारित...ता. 13.09.2026 साठी  मेतके येथील पूलावरुन वारंवार वाहनांच्या रांगा रुंदीकरणासह रस्ता आणि पूल होणार कधी ?
Published on

03688
मेतके (ता. कागल) ः येथील मार्गावर बाळूमामा दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची अशी कोंडी होते.
-
मेतके मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी
मोठा पूल उभारण्याची मागणी; बाळूमामांच्या भाविकांची वाढती गर्दी
प्रकाश कोकितकर : सकाळ वृत्तसेवा
सेनापती कापशी, ता. १२ : बाळूमामांचे मूळ क्षेत्र म्हणून मेतके (ता. कागल) मंदिराकडे येणा-या भाविकांची गर्दी वाढतच आहे. हमिदवाडा आणि गलगलेमार्गे मेतकेकडे जाणा-या मार्गावर वाहनांच्या नेहमी रांगा लागतात. यामुळे सारेच त्रस्त झाले आहेत. याबाबत शिवसेना, सरपंच परिषद आणि ग्रामस्थांनी अनेकदा मागण्या, आंदोलने केली. येथे रस्ता रुंदीकरणासह चिकोत्रा नदीवर मोठा पूल होणे गरजेचे असताना सार्वजनिक बांधकाम विभाग कशाची वाट पाहत आहे? असा प्रश्न आहे.
चिकोत्रा नदीवर १९७८ मध्ये स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रयत्नाने कोल्हापूर पद्धतीचे २८ बंधारे झाले. त्यातीलच हा पूल वजा बंधारा कमकुवत झाला आहे. त्यावरूनच वाहतूक सुरू आहे. दहा वर्षांत मेतके सद्‌गुरू बाळूमामा यांचे मूळ क्षेत्र आणि येथील एकमेव असलेल्या दिव्य खांबाच्या श्रद्धास्थानाने भेटी देणा-या भाविकांची संख्या लाखात आहे. महाराष्ट्रासह गोवा, आंध्रप्रदेश, कर्नाटकातून भाविक येतात. दिवसागणिक त्यात वाढ होत आहे. मात्र, अरुंद रस्ते आणि कमकुवत झालेला अरुंद पूल तोच आहे. या गावाला जोडलेले हमिदवाडा आणि गलगले फाटा हे मार्ग एकेरी केले, तरी वाहतूक करणे कष्टप्रद आहे. प्रत्येक रविवार आणि अमावास्येच्या दिवशी मेगा ब्लॉकच होतो. भाविकांच्या वाहनांच्या रांगा दोन, तीन किलोमीटरपर्यंत लागतात. अनेकदा भाविक पिकांतूनच मंदिरापर्यंत येत आहेत.
पावसाळ्यात चिकोत्राच्या पुलावरून पाणी पडते. या काळात वाहतूक अधिक धोकादायक बनते. गेल्या जूनमध्ये एक व्यावसायिक या अरुंद पुलावरून नदीतून पाचशे मीटरपर्यंत वाहून गेला. नदीकाठच्या झाडाच्या फांदीला पकडून कसाबसा त्याने जीव वाचवला.

कोट-
चिकोत्रा नदीवरील पूल वजा बंधारा जुनाट आणि कमकुवत झाला आहे. जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. या पुलावरून पडून अपघातही झाले आहेत. येथे रुंदीचा नवा पूल व रस्ता रुंदीकरणासाठी मंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिका-यांकडे शिवसेनेतर्फे मागणी केली आहे.
- राजेंद्र पाटील, माजी सरपंच, मेतके

03688

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com