कला - क्रिडा शिबिरांची धूम

कला - क्रिडा शिबिरांची धूम

75178, 75179

....................
कला, क्रीडा शिबिरांची धूम

मुलांच्या कलागुणांना वाव : परीक्षा संपण्यास अवघे काही दिवस

सकाळ वृत्तसेवा
शाहू नाका, ता. ४ : उन्हाळी सुटी लागण्यास अवघे काही दिवस असताना शालेय मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, या हेतूने विविध संस्थांबरोबर काही शाळांनीही उन्हाळी कला, क्रीडा शिबिरांचे आयोजन केले आहे. त्यामुळे उपनगरांत कला, क्रीडा शिबिरांची धूम असे चित्र पाहावयास मिळत आहे.
उन्हाळी शिबिरांमधून पाल्य काही तरी नवे शिकेल, अशी पालकांची धारणा निर्माण होत आहे. त्यामुळे उन्हाळी शिबिरांना पालकांची पसंती मिळत आहे. शिबिरासाठी उपनगरांतील सांस्कृतिक हॉल, मोकळे ग्राऊंड आगाऊ बुकिंग केले आहेत. सोशल मीडियावरून उन्हाळी शिबिराची माहिती पाठवली जात आहे. विविध वयोगटांतील मुलांसाठी दहा दिवसांपासून महिनाभराच्या कालावधीत शिबिराचे नियोजन केले आहे. पारंपरिक खेळांसोबत शालेय समाविष्ट खेळ शिकवण्यास शिबिर संयोजक पसंती देत आहेत. अनेक शाळा विद्यार्थ्यांसाठी विविध शिबिरांचे आयोजन करत आहेत.
....
कोट
00132
मोबाईलच्या युगात मुले खेळ व व्यायामाकडे दुर्लक्ष करत आहेत. खेळाची व व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी जिल्ह्यात सकाळी व दुपारी अशा दोन्ही सत्रांत शिबिरांचे आयोजन केले जाते. शिबिरातून त्यांना नक्कीच व्यायामाची व क्रीडा स्पर्धांची आवड निर्माण होऊन ते करिअर घडवू शकतात. 
- अरुण पाटील, क्रीडा अधिकारी 
....
00131
उन्हाळी सुटीत मुले मोबाईल, टीव्हीमधून बाहेर येतच नाहीत. त्यासाठी शिबिरे उपयुक्त ठरतात. विविध खेळांची शिबिरे घेतली जातात. त्यातून मुलांना खेळाची प्राथमिक माहिती मिळते. या माध्यमातून त्यांच्यात खेळाची आवडही निर्माण होते व व्यायामामुळे आरोग्यही चांगले राहते.  
- रघू पाटील, फुटबॉल प्रशिक्षक   
.....
00130
कला शिबिरात दाखल करताना पाल्यांची आवड पाहणेही तितकेच गरजेचे आहे. कला मुलांना जगायचे कसे शिकवते. पाठपुस्तकांशिवाय कलेमधून वेगळा आनंद मिळतो. त्यामुळे मुलांना अशा उन्हाळी कला शिबिरात दाखल करताना मुलांच्या इच्छेनुसार दाखल करणे महत्त्वाचे ठरेल.    
- मिलिंद देसाई, कलाशिक्षक
.............................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com