
सरवडे
B03204
डी.के.पाटील
सरवडे उपसरपंचपदी
डी. के. पाटील बिनविरोध
कोल्हापूर ,ता. ८ : सरवडे (ता. राधानगरी) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मोरे गटाचे डी. के. पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. निर्मलादेवी राजेंद्र पाटील होत्या. मावळते उपसरपंच शशीकला मोरे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने याठिकाणी पाटील यांची निवड करण्यात आली. ग्राम विकास अधिकारी एम.जी बोटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बिद्रीचे संचालक राजेंद्र पाटील, आर.के.मोरे, रणधीर मोरे, सदस्य तानाजी कुंभार, अरुण साठे,घनश्याम पाटील, शहाजी पाटील ,किरण गुरव, सुधा व्हरकट, सुनीता वागवेकर, शांताबाई शिंगे, संगीता काळुगडे, सविता कांबळे, आक्काताई वागवेकर उपस्थित होते. नूतन उपसरपंच डी.के.पाटील यांचा गोकुळचे संचालक विजयसिंह मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थांचे पदाधिकारी , ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते