Wed, March 29, 2023

सोळांकूर
सोळांकूर
Published on : 3 March 2023, 3:32 am
03313
‘...तर संस्थेसह सभासदांचीही उन्नती’
सोळांकूर : संचालक मंडळाने विश्वस्त भावनेने संस्था चालविल्यास संस्थेच्या प्रगतीबरोबरच सभासदांचीही उन्नती होते, हे आटेगावच्या भुतोबा सहकारी दूध संस्थेने सिद्ध केले, असे प्रतिपादन गोकुळचे संचालक प्रा. किसनराव चौगले यांनी केले. आटेगाव पैकी तळ्याचीवाडीत भुतोबा सहकारी दूध संस्थेच्या इमारत उद्घघाटन करून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच गणपतराव वागवेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून बिद्रीचे माजी संचालक भिकाजीराव एकल उपस्थित होते. संस्थाध्यक्ष मारुती तोडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी शिवाजी पाटील,प्रकाश पाटील, धनाजी तोडकर यांची भाषणे झाली. गणपतराव मोहिते, गुंडू कापसे, दत्तात्रय मोहिते, दिलीप तोडकर, संचालक उपस्थित होते. संभाजी मोहिते यांनी आभार मानले.