सोळांकूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोळांकूर
सोळांकूर

सोळांकूर

sakal_logo
By

खोकेवाले सरकार खाली
खेचण्यासाठी एकत्र येऊ

के. पी. पाटील; लिंगाचीवाडीत कार्यकर्ता मेळावा

सोळांकूर, ता. २७ : राज्यातील खोकेवाल्यांचे सरकार खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊ या, असे प्रतिपादन माजी आमदार
के. पी. पाटील यांनी केले.
लिंगाचीवाडी (ता. राधानगरी) येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार बजरंग देसाई होते. के. पी. पाटील म्हणाले, ‘काही दिवसांत बिद्री आणि विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. नेतेमंडळींची पळापळ चालू आहे. सहवीज प्रकल्पामुळे बिद्री कारखान्यास चांगले दिवस मिळाले. इथेनॉलचा प्रकल्प ऑक्टोबरपर्यंत चालू होऊन जवळपास ९००० हजार क्षमतेने बिद्री कारखान्याचे गाळपही चालू होईल. बिद्रीचे कार्यक्षेत्र हे मोठे असून उमेदवार निवडताना तारेवरची करावी लागते. सर्वांनी गट-तट विसरून खोकेवाल्यांना दूर करूया.’
के. पी. पाटील म्हणाले, ‘बजरंग देसाई यांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून मी जयवंत डवर यांच्याकडे सहानुभूतीपूर्वक पाहत असून दूधगंगा काठास योग्य न्याय देऊ. जिद्द सोडू नका. भविष्यात संधी मिळेल. अण्णांनी जयवंतराव डवर यांच्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्यांचे स्वप्न भविष्यात पूर्ण करू. गट विसरून आमच्या पाठीशी उभे राहा.’ यावेळी माजी सरपंच बशीर राऊत, एस. के. पाटील यांची भाषणे झाली.
यावेळी माजी आमदार बजरंग देसाई, बिद्रीचे संचालक राजेंद्र पाटील, उमेश भोईटे, के. ना. पाटील, भोगावतीचे संचालक बी. आर. पाटील, माजी सरपंच रमेश बचाटे, विलास पाटील, शिवाजी कांबळे, सरपंच संदीप डवर, दिनकर खाडे, तुकाराम परीट, विजय इंगवले, विलास पाटील, कृष्णा बेलेकर, बाबूराव परीट, दिनकर पाटील, वाय. डी. पाटील, राजाराम चौगले, दत्ता ढोकरे, कृष्णा खाडे, धोंडीराम नाटेकर, अच्चित पाटील, जितेंद्र डवर उपस्थित होते.