Sun, March 26, 2023

सरवडे
सरवडे
Published on : 2 March 2023, 3:22 am
03326
सरवडेत गटारींचे काम संथ
सरवडे : निपाणी-राधानगरी राज्य महामार्गाच्या कामांतर्गत येथे गटर बांधकाम होत आहे. या कामासाठी खोल चर मारली आहे. चर मारून अनेक दिवस झाले तरी पुढील काम नाही. त्यामुळे रस्त्यापलीकडे असणाऱ्या दुकानदारांतून नाराजी व्यक्त होत आहे. निपाणी-राधानगरी राज्य महामार्गाचे सरवडेत रुंदीकरणासह नूतनीकरण सुरू आहे सध्या एका बाजूला गटरीसाठी चर मारली आहे. त्यामुळे दुकानात जाता येत नाही. ग्राहक येत नसल्याने दुकानदारांचे अर्थिक नुकसान होत आहे. संबधित ठेकेदाराने दुकानदारांचे नुकसान लक्षात घेऊन गटारीचे काम तत्काळ करावे, अशी मागणी व्यावसायिक अरुण मोरे व संदीप पाटील यांनी केली.