
सरवडे
03350
विजयसिंह मोरे अनंतात विलीन
सरवडे, ता. १८ : गोकुळ दुध संघाचे संचालक विजयसिंह कृष्णाजी मोरे यांच्यावर हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत आज मोरे मळ्यात अंत्यसंस्कार झाले. मोरे यांचे शुक्रवारी मुंबईत निधन झाले होते. आज सकाळी आठ वाजता पार्थिवाचे हजारो लोकांनी दर्शन घेतले. अकराला अंत्ययात्रा निघाली. पुत्र रणधीर मोरे यांनी चितेला भडाग्नी दिला. यावेळी शोकसभेत माजी मंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, के. पी. पाटील, आमदार प्रकाश आबिटकर यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी दिनकरराव जाधव, संजयबाबा घाटगे, उदयसिंह पाटील, ए. वाय. पाटील, के. जी. नांदेकर, विठ्ठलराव खोराटे, राजेंद्र पाटील, नंदकिशोर सूर्यवंशी, फिरोजखान पाटील, पंडितराव केणे, सुरेशराव सूर्यवंशी, हिंदुराव चौगुले, अरुण जाधव, जयसिंग खामकर, संजय कलिकते, भिकाजी एकल, आर. डी. देसाई, गणपतराव फराकटे, शिवाजी पाटील, जीवन पाटील, अमरिश घाटगे, राजेखान जमादार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.