सरवडे

सरवडे

03449
...

झाडावरुन पडून तरुणाचा मृत्यू

मांगोली येथील घटनाः जांभळे खाण्याचा मोह बेतला जीवावर


सरवडे, ता.२: राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर-  मांगोली मार्गावरील ओढ्याजवळ असणाऱ्या जांभळाच्या झाडावरून पडून सुरज भाऊसो पाटील (वय ३०, रा. इंग्रुळ ता. शिराळा जि. सांगली) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी (ता.१) दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
 घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सोमवारी दुपारी सूरज पाटील बत्तीस शिराळा येथून चारचाकी गाडीने राधानगरी तालुक्यातील मांगोली येथील प्रवाशी भाडे घेऊन आला होता. प्रवाशांना सोडून परत जाताना  मांगोली- कपिलेश्वर रस्त्यावरील ओढ्याजवळ त्याला जांभळीचे झाड दिसले. जांभळे तोडण्यासाठी झाडावर चढला असता झाडाची फांदी तूटून तो ओढ्याच्या आरसीसी कठड्यावर पडला. यामध्ये गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड, पोलिस कृष्णात यादव, प्रवीण गुरव, पोलीस पाटील वसुधा पाटील, मानसिंग काटकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला. सूरजच्या मागे पत्नी, आई, वडील असा परिवार आहे.

....

सहा महिन्यांपूर्वी लग्न

सुरज पाटील याचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. त्याचे किराणा मालाचे दुकान असून तो प्रवासी भाडेही करत होता. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे नातेवाईकांनी घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात केलेला आक्रोश ह्रदय पिळवटणारा होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com