सायकलस्वार मुलगा वाहनाच्या धडकेत जखमी

सायकलस्वार मुलगा वाहनाच्या धडकेत जखमी

सायकलस्वार मुलगा
वाहनाच्या धडकेत जखमी
सरवडे : आकनूर (ता. राधानगरी) येथील प्रतीक विक्रम पाटील याच्या सायकलला अनोळखी वाहनाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली आहे. प्रतीक पाटील सरवडे येथून आकनूरकडे सायकलवरून येत होता. दूधगंगा नदी पुलाजवळ आला असता अनोळखी वाहनाने त्याच्या सायकलला जोराची धडक दिली. तो पुलाच्या कठड्यावर आपटल्याने त्याच्या चेहऱ्याला गंभीर जखम झाली. प्रतीक खोराटे विद्यालयात नववीच्या वर्गात शिकत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com