बीग स्टोरी..चांदोली धरण

बीग स्टोरी..चांदोली धरण

लोगो- बीग स्टोरी
-डी. आर. पाटील
---
फोटो- 01361, 01362

पर्यटकांची ‘चांदोली’ला पसंती
दहा वर्षांत ५७, ७१०, सरत्यावर्षी दहा हजार जणांनी दिली भेट

सरुड ः निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे चांदोली अभयारण्य. त्यामुळे येथे पर्यटकांची रेलचेल अलीकडे वाढली आहे. निसर्गाला बाधा न पोहचता निसर्गाला डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी व पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अपोआपच पाय वळतात. गतवर्षीप्रमाणे यंदाही चांदोली राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांचा ओघ वाढला आहे. २०१२-१३ पासून दहा वर्षांत ५७, ७१० पर्यटकांनी तर २०२२-२३ या वर्षात मे अखेरपर्यंत दहा हजार पर्यटकांनी भेट दिली. साहजिकच सिमेंटच्या जंगलातून नैसर्गीक जंगलातील आनंद लुटण्याकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे.
---
हिरवीगर्द वनराई
सध्या शिराळा तालुक्यातील झोळंबी येथे २१ किलोमीटर जंगल सफारी सुरू आहे. या निमित्ताने येथील स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान वनविभागाने पर्यटकांना जंगल सफारीसाठी दोन वाहनांची व्यवस्था केली आहे.
शाहूवाडी-शिराळा तालुक्याचा हा पश्चिम भाग चांदोली राष्ट्रीय उद्यान, पावसाळ्यात फुलणारी विविध रंगी फुले आणि वनस्पती, चांदोली धरण, वसंत सागर जलाशय, पठारावर असणाऱ्या पवनचक्क्या, पावसाळ्यात कोसळणारे धबधबे यामुळे पर्यटकांना आकर्षित करतो. चांदोलीत प्रवेश केल्यानंतर आजूबाजूला असणारी हिरवीगर्द वनराई पर्यटकांना आकर्षित केल्याशिवाय रहात नाही. उद्यानात गेल्यानंतर पर्यटकांना गवे, सांबर, रानडुक्कर, माकडे, वानर, विविध प्रकारची फुलपाखरे विविध झाडे, फुले, वनस्पती पाहवयास मिळतात.


चार ठिकाणाहून जाता येईल
● कोल्हापूर-बांबवडे-कोकरूड-शेंडगेवाडी-चांदोली
● रत्नागिरी-आंबा-मलकापूर-कोकरूड-शेडगेवाडी-चांदोली
● सातारा-कराड-पाचवड फाटा शेडगेवाडी-चांदोली
● सांगली-पेठ नाका-शिराळा-कोकरूड शेडगेवाडी-चांदोली

दृष्टिक्षेपात चांदोली अभयारण्य..

● झोळंबीत पर्यटकांना पाहण्याची प्रमुख ठिकाणे
जनीचा आंबा, लपनगृह, झोळंबी सडा, विठ्ठलाई मंदिर, शेवताई मंदिर, मणदूर ते झोळंबी २१ किलोमीटर

●उखळू ते उदगिरी सफरीतील ठिकाणे
तांबवे टॉवर, उदगिरी मंदिर, कोकण दर्शन (वारणावती-उदगिरी अंतर २० कि.मी.) पण, सध्या ही सफर बंद आहे.

● प्रवेश शुल्क : १२ वर्षांआतील मुले ः ५०, प्रौढ ः १०० रु. (प्रति व्यक्ती)
● सफारी वाहन (टेम्पो) ः १०० रु.
● गाईड शुल्क ः ५० रुपये
● शैक्षणिक सहलीसाठी शुल्क : शालेय विद्यार्थी- २५,महाविद्यालयीन विद्यार्थी ५० रु.
● उद्यानात प्रवेश वेळ : स.६ ते दु.३ (गुरुवारी बंद)
● वारणावती येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयात पर्यटकांना पासची सोय

चार्ट करणे
वर्षनिहाय पर्यटक संख्या
• २०१२-१३ : २०१०
• २०१३-१४ : २५४०
• २०१४-१५ : २९३४
• २०१५-१६ : ४१४२
• २०१६-१७ : ४४०६
• २०१७-१८ : ८११३
• २०१८-१९ : ८६४१
• २०१९-२० : २५३५
• २०२०-२१ : ६०४७
• २०२१-२२ : ७०६८
• २०२२-२३ : ९२७४

कोट
चांदोली राष्ट्रीय उद्यानात ३३ प्रजातीचे सस्तन प्राणी, २४४ प्रजातींचे पक्षी, १२० प्रजातींची फुलपाखरे, २२ प्रजातींचे उभयचर प्राणी, ४४ प्रजातींचे सरपटणारे प्राणी आदी प्राण्यांचे वास्तव्य तर १४५२ प्रकारच्या विविध वनस्पती व ४०० प्रकारच्या औषधी वनस्पती या उद्यानात आढळून येतात.
-नंदकुमार नलवडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, चांदोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com