कर्कश ध्वनी यंत्रणा, लेसर शोबाबत मौन!

कर्कश ध्वनी यंत्रणा, लेसर शोबाबत मौन!

Published on

कर्कश ध्वनी यंत्रणा, लेसर शोबाबत मौन!
ग्रामपंचायतींची भूमिका; काही गावांत मात्र विधायक निर्णय
सकाळ वृत्तसेवा
सरूड, ता. १८ : वाढलेल्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी कर्कश ध्वनियंत्रणा आणि लेसर शोवर बंदी घालण्यासाठी ग्रामीण भागातील काही ग्रामपंचायती सरसावल्या आहेत. मात्र, म्हणाव्या त्या प्रमाणात ग्रामपंचायती पुढे आलेल्या दिसत नाहीत. केवळ मताच्या गट्टयाला का दुखवावे म्हणून ग्रामपंचायतींनी मौन पाळले आहे.
शहरी व ग्रामीण भागात होणारे नेत्यांचे वाढदिवस, विवाह सोहळे, वराती, निवडीच्या मिरवणुका, यात्रा यासाठी मोठ्या प्रमाणात कर्कश ध्वनी यंत्रणा व लेसर लाईट शो वापरला जातो. याचा त्रास हृदयरोग असणाऱ्यांपासून गरोदर महिला, वृद्ध आणि इतर व्याधी असणाऱ्या अनेकांना सहन करावा लागतो. पोलिस कारवाई करावयास गेल्यास राजकीय हस्तक्षेपामुळेही कर्कश ध्वनी यंत्रणा वापरण्याचे प्रकार वाढले आहेत.
हजारो-लाखो रुपयांचा चुराडा करून अशा गोष्टी वापरणे अनेकांना महागात पडले आहे. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी शहरी व गांव पातळीवर उठाव होणे गरजेचे आहे. मात्र काही गोष्टींना खतपाणी घालण्याचे काम शासनस्तरावर होत आहे.
------------------
चौकट
३०-४० किमीवरुन तरुणांचा सहभाग
कर्कश ध्वनी यंत्रणा आणि यात्रेत नाचवल्या जाणाऱ्या नर्तिका एकदा निश्चित झाल्या की त्याची सोशल मिडीयावरुन जाहिरात केली जाते. मग ३०-४० किमीवरुन तरुणांच्या झुंडी येतात. मंडळांची यातून टोकाची इर्षा तयार होते. नुसतीच मिसरुड फुटलेल्या पोरांचा मग टायगर, डॉन, बादशहा असे ग्रुप तयार होतात आणि नर्तिका बरोबर ठेका धरला जातो. तेंव्हा मग प्रश्‍न पडतो या पिढीचे होणार कसे?
----------------
तक्रार द्यावी लागतेच काय?
गावागावात यात्रा-जत्रांच्या निमित्ताने ध्वनी यंत्रणेचा दणदणाट आवाज आणि त्याच्या तालावर थिरकणाऱ्या नर्तिकांचा अश्लील आदा पाहून तरुण पिढी झिंग होवून बेभानपणे नाचताना दिसते. पोलिसांच्या कानावर हा कर्कश आवाज पडूनही त्यांना तक्रारच का लागते? असा प्रश्‍न समाजातून उपस्थित होतो.
-------------
हृदयाचा त्रास, रक्तदाब असणाऱ्या व गर्भवती महिलांनी कर्कश ध्वनी यंत्रणेपासून विशेष काळजी द्यायला हवी.
- डॉ. अमृत पाटील, बांबवडे
----------------
कोट
पिशवी गावात यात्रेनिमित्ताने आणलेल्या कर्कश ध्वनी यंत्रणा आणि लेसर मुळे दोन मुलांच्या डोळ्यांना गंभीर इजा, तर चौघांचा रक्तदाब वाढून हृदयाचा त्रास झाला. या प्रकारानंतर गावानेच कर्कश ध्वनी यंत्रणेच्या बंदीचा निर्णय घेतला. असा निर्णय घेणारी तालुक्यातली ही पहिली ग्रामपंचायत आहे.
- आनंदा तोरस्कर, माजी सरपंच, पिशवी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.