Wed, Feb 1, 2023

शिरोळ मध्ये शॉर्ट सर्किटमुळे घराला आग
शिरोळ मध्ये शॉर्ट सर्किटमुळे घराला आग
Published on : 10 January 2023, 6:12 am
शिरोळला आग लागून
चार लाखांचे नुकसान
शिरोळ : येथील रोहित बाळासो सुतार यांच्या राहत्या घरात इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटने आग लागून चार लाखांचे नुकसान झाले. सोमवारी रात्री आठच्या सुमारास सुतार यांच्या घरात अचानक आग लागली. आगीत घरातील प्रापंचिक साहित्य, धान्य, कपडे व पाच तोळे सोने तसेच रोख रक्कम तीन लाख, जीएसटी, कर्ज प्रकरणाकरिता लागणारी कागदपत्रे, प्रॉपर्टी दस्तऐवज, टू व्हीलर, फोर व्हीलरच्या कागदपत्रे, आगीत जळून खाक झाले. याबाबतची वर्दी रोहित सुतार यांनी शिरोळ पोलिसांत दिली आहे. पोलिस हेड कॉन्स्टेबल पाटील अधिक तपास करीत आहेत.