Wed, Feb 1, 2023

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
Published on : 13 January 2023, 4:24 am
शिरोळमध्ये ‘उत्पादन शुल्क’ कडून
तीन लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
शिरोळ, ता. १३ ः येथील दत्तराज पेट्रोल पंपासमोर राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजी विभागाच्या पथकाने वेगवेगळ्या कंपन्यांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. या कारवाईत सुमारे तीन लाख ८६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी रेंदाळ येथील मिथुन आड्याप्पा मोकाशी व दीपक आड्याप्पा मोकाशी या दोघांना अटक करण्यात आली असून अजित केसरकर हा पळून गेला आहे. पथकाने चारचाकी गाडी, दोन मोबाईल व गोवा बनावटीचे मद्य आदी मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई दुय्यम निरीक्षक वर्षा पाटील, अंकिता पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक बलराम पाटील, जवान सागर नागटीळे, शिवलिंग कंठे, विशाल आळतेकर यांच्या पथकाने केली.