अभ्यास गटाला विरोध करा ः चुडमुंगे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभ्यास गटाला विरोध करा ः चुडमुंगे
अभ्यास गटाला विरोध करा ः चुडमुंगे

अभ्यास गटाला विरोध करा ः चुडमुंगे

sakal_logo
By

अभ्यास गटाला विरोध करा ः चुडमुंगे
शिरोळ, ता.२३ ः तोडणी वाहतुकीतील लूट कायदेशीर करण्यासाठी साखर आयुक्तांकडून अभ्यास गटाची नेमणूक केली आहे. अभ्यास गटाच्या अहवालामधुन पुढील हंगामात तोडणी वाहतूक खर्च म्हणून एफआरपीमधून एक हजार रुपये कपात होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व शेतकरी संघटनांनी या अभ्यास गटाला आक्षेप घेवून विरोध करावा, अशी मागणी आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केली आहे.
चुडमुगे म्हणाले, ‘ कारखान्यांना, कायद्यातील तरतुदीमधील खर्चाव्यतिरिक्त अन्य बोगस खर्च, तोडणी वाहतूक खर्चात कायद्याने घालता यावेत म्हणून साखर आयुक्तांनी अभ्यास गट नेमला आहे. फक्त साखर कारखान्यांचे हित साधण्यासाठी या अभ्यास गटात साखर कारखान्यांच्या संबंधित संस्था, अधिकारी, एम डी लेखापरीक्षक, कारखान्याचे अकौंटंट, सनदी लेखापाल यांना घेतले आहे. विशेष म्हणजे साखर कारखान्याची संघटना असलेला, साखर संघाला या अभ्यास गटात घेतले आहे. पण शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना मात्र या अभ्यास गटात घेतलेले नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही विचार न करणारा अभ्यास गट, साखर आयुक्तांनी साखर संघाचे ऐकून निवडला आहे. हे या अभ्यास गटातील निवडीवरून दिसत आहे.’