राजू शेट्टींच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजू शेट्टींच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट
राजू शेट्टींच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट

राजू शेट्टींच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट

sakal_logo
By

78784
शिरोळ ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सत्कार राजू शेट्टी आणि त्यांच्या कुटुंबियांनी केला.
---------
राजू शेट्टींच्या निवासस्थानी
केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट
शिरोळ, ता. २९ ः केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी राजू शेट्टी यांच्या कुटूंबियांकडून सत्कार केला.
श्री. गडकरी व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील शनिवारी शिरोळ तालुक्याच्या दौऱ्यावर होते. स्वाभिमानी औद्योगीक वसाहतीमधील चकोते इंडस्ट्रीजच्या उदघाटनानंतर शिरोळ येथील राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी शेट्टी यांच्या कुटूंबियांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नितीन गडकरी यांचे स्वागत करून सत्कार केला.
भेटीवेळी नितीन गडकरी व राजू शेट्टी यांच्यादरम्यान शिरोळ तालुक्यातील महापुरास कारणीभूत असणाऱ्या मांजरी पुलाचा भराव कमी करून बॅाक्स बांधकाम करणे, संकेश्वर ते बांदा या रस्त्याच्या भुसंपादनाबाबत, ऊस तोडणीचा प्रश्न गंभीर होवू लागल्याने ऊस तोडणी मशिनसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अनुदान देण्याबाबत केंद्र सरकारकडे विशेष पाठपुरावा करण्यासह विविध विषयांवर चर्चा झाली.
खासदार धनंजय महाडिक, माजी बांधकाम व आरोग्य सभापती सावकर मादनाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, राजेंद्र गड्यान्नावर, सागर शंभुशेटे, राम शिंदे, शैलेश चौगुले, सतिश हेग्गाणा, भरत इसराण्णा, सुभाष शेट्टी, सोमेश्वर गोलगिरे, अजित दानोळे आदी उपस्थित होते.
----------------
राजूच्या पाठीशी राहा
माजी खासदार राजू शेट्टी व मंत्री गडकरी यांची मैत्री आहे. दिल्लीमध्ये गडकरी नेहमी शेट्टी यांचा पाहुणचार करतात. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी शेट्टी यांच्या घरी चहापाणी केले. यावेळी शेट्टी यांच्या मातोश्री रत्‍नाबाई यांचा गडकरी यांनी आशीर्वाद घेतला. यावेळी त्या भावुक झाल्या. त्या म्हणाल्या,‘ मैत्री कायम राहू दे, आणि राजूच्या पाठीशी राहा.’