
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी सामुदायिक शेतीची गरज गणपतराव पाटील
82748
दत्तवाड : येथे क्षारपड जमीन सुधारणा कामाचा प्रारंभ गणपतराव पाटील यांच्या हस्ते झाला.
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी
सामुदायिक शेतीची गरज
गणपतराव पाटील; दत्तवाडला क्षारपड सुधारणा सुरू
शिरोळ, ता. १५ : दत्तवाड येथे ७०० ते ८०० एकर जमीन क्षारपड बनली आहे. क्षारपड जमीन सुधारण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामुदायिक शेती केली पाहिजे. सामुदायिक विचाराने शेती करण्याच्या पद्धतीला दिशा देणे आवश्यक आहे. या कामात जात, पात, धर्म, राजकारण न करता शेतकऱ्यांनी दिलखुलासपणे, क्षारपड मुक्तीच्या या योजनेत सहभाग होऊन आपली प्रगती साधावी, असे आवाहन श्री. दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.
दत्तवाड येथील १५० एकर जमीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत मुख्य पाईपलाईन सर्व्हे कामाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते केले. या वेळी ते बोलत होते.
सरपंच चंद्रकांत कांबळे म्हणाले, ‘‘क्षारपड मुक्तीची योजना राबविलेला दत्त साखर कारखाना हा पहिलाच कारखाना आहे. शेती नापीक असताना शेतकऱ्यांना कारखान्याने जीवनदान देण्याचे काम केले आहे.’’ याप्रसंगी मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगान्ना यांनी या योजनेची संपूर्ण माहिती सांगितली. प्रवीण सूर्यवंशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संजय पाटील यांनी आभार मानले.