गणेश वाडीच्या पालक विद्यार्थ्यांचे पंचायत समिती समोर थाळी नाद आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेश वाडीच्या पालक विद्यार्थ्यांचे पंचायत समिती समोर थाळी नाद आंदोलन
गणेश वाडीच्या पालक विद्यार्थ्यांचे पंचायत समिती समोर थाळी नाद आंदोलन

गणेश वाडीच्या पालक विद्यार्थ्यांचे पंचायत समिती समोर थाळी नाद आंदोलन

sakal_logo
By

00784
.....

शिक्षक मागणीसाठी गणेशवाडीच्या
विद्यार्थ्यांचे थाळीनाद आंदोलन
शिरोळ, ता. २० ः गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील जिल्हा परिषदेच्या विद्यामंदिर शाळेतील मुला-मुलींसह पालक, ग्रामपंचायत पदाधिकारी, शालेय व्यवस्थापन समितीतर्फे आज शिक्षक मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. तालुका शिक्षण विभागाचा निषेध नोंदविण्यात आला.
सरपंच प्रशांत अपिणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश देवताळे यांच्या नेतृत्वाखाली मुला-मुलींसह पालक, ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीने पंचायत समितीवर थाळीनाद आंदोलन केले. या वेळी पटसंख्येनुसार शिक्षक द्या, शाळेत न येणाऱ्या ‘त्या’ दोन शिक्षकांची बदली करा, अशा घोषणा देण्यात आल्या. शिष्टमंडळातर्फे शिक्षणविस्तार अधिकारी ओमासे यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, लवकरच दोन शिक्षक देण्याचे आश्वासन देण्यात आले. संबंधित शिक्षिकेच्या बदलीसाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जातील, असे आश्वासन विस्तार अधिकारी ओमासे यांनी दिल्यावर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेचे सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर व भाजपचे मुकुंद गावडे यांनी आंदोलनात शिष्टाई घडवून आणली.
या आंदोलनात उपसरपंच जयपाल खोत, सदस्य शरद कांबळे, राहुल कोळेकर, सदस्या माधुरी भुशिंगे, रूपाली देवताळे, माधुरी अंकलकोपे, व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संदीप अंकलकोपे यांच्यासह मनीषा काळे, नीता करडे, नीता बिरनाळे सहभागी झाले.